Education and Learning. Agricultur Information. New's and Job. Gov.t scheme /G.R Health Tips
Monday, 29 May 2023
Aadhar Card Bank Linking Status | तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे? असे चेक करा?
Saturday, 20 May 2023
नोटबंदीची घोषणा ! 2000 हजारांच्या नोटा चलनातून मागे घेणार, RBI चा निर्णय.....अशा बदलून मिळणार नोटा जाणून घ्या काय आहे प्रक्रिया....
Tuesday, 16 May 2023
नोकरी: आरोग्य संचालनालय अंतर्गत 6000+ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु.!
Monday, 8 May 2023
फेरफार उतारा ऑनलाईन कसा डाऊनलोड करायचा?
फेरफार उतारा ऑनलाईन कसा डाऊनलोड करायचा?
गावपातळीवर फेरफार म्हणजेच गाव नमुना-6 अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या जमीन अधिकार अभिलेखात जे बदल होतात, त्याची नोंद फेरफारात ठेवली जाते.
फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर माहिती दिलेली असते.
पण तुम्हाला माहित आहे का, तुम्ही घरबसल्या मोबाईलवर डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार उतारा डाऊनलोड करू शकता. तशी सुविधा महसूल विभागानं 1 ऑगस्ट 2021 पासून उपलब्ध करून दिली आहे.
हा फेरफार उतारा डाऊनलोड कसा करायचा, याची माहिती आपण आता जाणून घेऊया.
फेरफार उतारा कसा काढायचा?
1) फेरफार उतारा काढण्यासाठी तुम्हाला digitalsatbara.mahabhumi.gov.in या वेबसाईट वर जायचं आहे.
2)यानंतर महसूल विभागाचं आपला 7/12 नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
3)तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, इथं येऊन सातबारा, आठ-अ काढला असेल,तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.
4)पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असेल, तर मोबाईल क्रमांक वापरूनही तुम्हाला इथल्या सेवांचा लाभ घेता येतो.
4)त्यासाठी OTP Based Login या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
5)त्यानंतर Enter Mobile Number च्या खालच्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मग Send OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
5)तुम्ही या पर्यायावर क्लिक केलं की, OTP sent on your mobile असा मेसेज तिथं येईल.
7)याचा अर्थ तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच One Time Password म्हणजेच काही आकडे पाठवलेले असतात, ते जसेच्या तसे तुम्हाला Enter OTP च्या खालच्या रकान्यात टाकायचे आहेत.
8)त्यानंतर Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
9)पुढे तुमच्यासमोर आपला सातबारा नावानं एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed eFerfar, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसतील.
10)यातल्या Digitally signed eFerfar या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
11)त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीत फेरफार असं शीर्षक असलेलं पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
12)यामध्ये सगळ्यात शेवटी सूचना दिलेली आहे की, Rs.15 will be charged for download of every eferfar. This amount will be deducted from available balance.
13)याचा अर्थ फेरफार उताऱ्यासाठी 15 रुपये चार्ज केले जातील, ते तुमच्या उपलब्ध बॅलन्समधून कापले जातील.
14)आता आपण नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे आपल्या खात्यात इथं काही बॅलन्स नसतं. त्यामुळे सगळ्यात आधी खात्यात पैसे जमा करणं गरजेचं असतं.
15)ते कसे करायचे तर खाली असलेल्या रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
16)तिथं एंटर अमाऊंट समोर 15 रुपये एवढा आकडा टाकायचा आहे आणि मग पे नाऊवर क्लिक करायचं आहे.
17)त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तिथं असलेल्या छोटा डब्ब्यात टिक करायचं आहे आणि मग कन्फम बटन दाबायचं आहे.
18)त्यानंतर हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम ॲप असेल तर त्याद्वारे जमा करता येऊ शकतात. तसे वेगवेगळे पर्याय इथे दिलेले आहेत.
19)पेमेंटसाठीची ही माहिती भरली की तुमच्या मोबाईलववर एक ओपीटी पाठवला जातो. तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे.
20)त्यानंतर स्क्रीनवर your payment was successful याचा अर्थ तुम्ही 15 रुपये जमा केले आहेत, असा मेसेज येतो. इथं असलेल्या continue या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
21)त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीतल्या सातबारा उताऱ्याचं पेजवर तिथं ओपन होईल.
22)पण आपल्याला फेरफार काढायचा असल्याने Digitally signed eFerfar यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
23)त्यानंतर तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव, फेऱफार नंबर टाकायचा आहे.
24)तुमच्या सातबारा उताऱ्यावरील हा फेरफार क्रमांक नमूद केलेला असतो.
25)शेवटी डाऊनलोड पर्यायावर क्लिक करायचं आहे.
26)त्यानंतर RS.15 will be deducted from your available balance for Ferfar download, असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. त्याखालच्या ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार तिथं डाऊनलोड होईल.
27)यात सुरुवातीला फेरफाराचा क्रमांक, त्यानंतर अधिकाराच्या स्वरुपात काय बदल झाला, याची सविस्तर माहिती दिलेली असते. पुढे परिणाम झालेले गट क्रमांक आणि अधिकाऱ्याचं नाव आणि शेरा दिलेला असतो.
28)या उताऱ्यावर शेवटी स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, हा अभिलेख फेरफाराच्या डिजिटल स्वाक्षरीत 21-07-2021 रोजी डेटा वरून तयार झाल्यामुळे यावर कोणाच्याही सही-शिक्क्याची आवश्यकता नाही.
3) प्रकारच्या सुविधा
आपली चावडी उपक्रमाअंतर्गत नागरिकांना घरबसल्या डिजिटल सुविधा मिळणार आहेत.
सध्या तीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
👉यात नोटीस पहा या रकान्यात नागरिक फेरफाराची नोटीस पाहू शकतात. ही माहिती आपण नुकतीच पाहिली आहे.
👉त्यानंतर फेरफाराची स्थितीमध्ये फेरफाराच्या नोटीशीवर कुणी हरकत घेतली आहे का, हरकतीचा शेरा आणि तिचा तपशील दिलेला असतो. हरकतीसाठी 15 दिवसांचा अवधी दिला जातो. या कालावधीत कुणी
हरकत घेतली नसेल तर फेरफारावरील नोंद प्रमाणित केली जाते आणि मग ती सातबाऱ्यावर नोंदवली जाते.
👉त्यानंतर तिसरा पर्याय आहे मोजणीची नोटीस. यात तुमच्या गावात जमीन मोजणी कुणी आणली आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.
💥यात मोजणीचा प्रकार, मोजणीचा रेजिस्ट्रेशन क्रमांक, तालुका आणि गावाचं नाव, ज्या गट क्रमांकावर मोजणी करायची आहे तो गट क्रमांक, मोजणीचा दिनांक आणि मोजणीस येणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक दिलेला असतो.
💥यानंतर शेतजमिनीचे लगतचे खातेदार आणि सहधारक यांची माहिती नमूद केलेली असते.
Friday, 5 May 2023
कंपोस्टखत तयार करण्याच्या पद्धत जाणून घ्या काय आहेत फायदे?
-
अँपवर फोटो टाका 72 तासात खड्डे मुक्त व्हा! *Public Work Department* Maharashtra Gov.त 💁♂️नमस्कार मित्रांनो सार्वजनिक बांधकाम व...
-
महिला सन्मान बचत पत्रात करा गुंतवणूक मिळेल चक्री वाढ व्याज! Mahila Sanman Saving Certificate -2023 👮 केंद्र सरकारची डाक कार्याल...
-
पावसाचा नवा अंदाज जाहीर असा असणार राज्यातील मान्सून:= सन २०२३ साठीचा मान्सून चा अंदाज जाहीर, पहा कसा असेल पावसाळा स्कायमेट या भा...