कंपोस्टखत तयार करण्याच्या पद्धत जाणून घ्या काय आहेत फायदे?
*शेतामध्ये उपलब्ध असलेला टाकाऊ स्वरूपाचा काडीकचरा, गोठ्यातील जनावरांचे मलमूत्र, पिकाचे उरलेले अवशेष, तसेच बांधावरील झाडाची पानगळ इत्यादी अवशेषांचे जिवाणूंच्या सहयोगाने कुजवून तयार केलेले खत म्हणजे कंपोस्ट खत होय.
💥कंपोस्ट खत पद्धती💥
💥इंदौर पद्धत :-
🌲इंदौर पद्धतीलाच ढीग पद्धत म्हणतात. या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे 6 फूट रुंद व 5 ते 6 फूट उंच आणि सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेनुसार लांबी ठेवून शेतातील उरलेले पिकांचे अवशेष, काडीकचरा, शेण, तण इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा त्यावर एक थर ठेवला जातो.
🌲 ढीग पद्धतीमध्ये कुजण्याची प्रक्रिया उघड्यावर (ऑक्सिजनयुक्त) लवकर होण्याकरिता एका महिन्याच्या अंतराने ढीग वर-खाली करून कुजणारे पदार्थ एकजीव केले जातात.
🌲तसेच ओलावा टिकविण्याकरिता पाणी शिंपडले जाते. याशिवाय ढिगावर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकल्यास तापमानात वाढ होऊन
🌲कुजण्याची क्रिया जलद होण्यास मदत होते. 3 ते 4 महिन्यांत चांगले कंपोस्ट खत तयार होते.
🌲या खतामध्ये 0.8 ते 1.5 टक्के नत्र, 0.5 ते 1 टक्का स्फुरद व 1 ते 1.8 टक्के पालाश मिळून इतर अन्नघटक असतात.
💥बंगलोर पद्धत:-
🌲बंगलोर पद्धतीलाच खड्डा पद्धत म्हणतात. या पद्धतीमध्ये सर्वांत खालचा थर 15 ते 20 सें. मी. जाडीचा काडीकचरा व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन पाणी शिंपडून ओला केला जातो.
🌲अशा प्रकारे खड्डा भरून जमिनीच्या सुमारे दीड ते दोन फूट उंचीपर्यंत शेणमाती मिश्रण करून लिंपून घेतले जाते.
🌲सेंद्रिय पदार्थांची कुजवण्याची क्रिया लवकर होण्याकरिता अधूनमधून पाणी शिंपडले जाते.
🌲 कुजण्याची क्रिया सुरवातीला ऑक्सिजनविरहित वातावरणात होत असल्याने कुजण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे खत तयार होण्यास वेळ लागतो.
🌲या पद्धतीमध्ये अन्नद्रव्ये वाया जाण्याचे प्रमाण कमी असते.
💥नॅपेड पद्धत:-
🌲या पद्धतीत जमिनीवर पक्क्या विटांच्या साह्याने 10 फूट लांब, 6 फूट रुंद व 3 फूट उंच अशा आकाराचे टाकीचे बांधकाम केले जाते. विटांच्या दोन ओळींनंतर तिसऱ्या ओळीत खिडक्या ठेवल्या जातात.
🌲या पद्धतीमध्ये सुमारे एक ते दीड टन काडीकचरा, 100 कि. ग्रॅ. शेण, दीड टन चाळलेली माती भरली जाते.
🌲नॅपेड पद्धतीमध्ये सर्वांत खालचा थर चांगला ठोकून शेणाचा सडा टाकून घेतात.
🌲त्यानंतर 6 इंच जाडीचा काडीकचरा थर व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन त्यावर 100 लिटर पाण्यात 4 ते 5 कि. ग्रॅ. शेण मिसळून शिंपडले जाते.
🌲यानंतर साधारणतः 1 ते 2 इंच जाडीचा चाळलेला मातीचा थर अर्धा देऊन परत पाणी शिंपडून ओलावा केला जातो. अशा प्रकारे 3 ते 4 महिन्यांत उत्कृष्ट कंपोस्ट तयार होते.
💥कंपोस्ट खताचे फायदे:-
👆कंपोस्ट खत हा सर्वसामान्य शेतकरी स्वतःच्या शेतावर तयार करू शकतो.
👆कंपोस्ट खतनिर्मिती ही खर्चिक नसून, आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहे. टाकाऊ सेंद्रिय पदार्थाचा पुनर्वापर होतो.
👆कंपोस्ट खतामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढल्याने धूप कमी होते.
👆कंपोस्ट खतामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपिकता टिकवून सूक्ष्म जीवांची संख्या वाढते.