1 रुपयात पीक विमा
👳♀️शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पिक विमा योजने संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण आणि शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी अपडेट आली आहे. मित्रांनो खरीप हंगाम 2023 पासून पंतप्रधान पिक विमा योजनेत आता शेतकऱ्यांना आता एक रुपया भरून या ठिकाणी पिक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे.
1 रुपयात पीक विमा
💁♂️या संदर्भातील मंत्रिमंडळ निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाआहे . मागे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयास मंत्रिमंडळांने मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती असल्यास की यावेळी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली होती. खरीप हंगाम 2023 पासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपये शेतकरी हिस्सा भरून पिक विमा योजने सहभागी होता येणार आहे. तर याच आता मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच याबद्दल शासन निर्णय सुद्धा निर्मित करण्यात येणार आहे.
1 रुपयात पीक विमा
💁♂️शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्यानंतर 2023 मध्ये जो की 1 जुलै 2023 पासून पिक विमा योजनेची सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये शेतकरी बांधवांना 1 रुपये शेतकरी हिसा भरून या ठिकाणी पिक विमा योजने सहभागी होता येणार आहे.
👉उर्वरित जो हिस्सा असेल तो हिस्सा राज्य सरकार
भरणार आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांसाठी
अतिशय दिलासादायक आणि आनंदाची ही बातमी असणार आहे.
👳♀️शेतकरी मित्रांनो केवळ एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यात सर्व समावेश पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय मागे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पी भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून प्रधानमंत्री पिक विमा योजने लाभ देण्यात येईल.
💁♂️या बैठकीचे अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी पिकांचे सरासरी नुकसान काढताना किमान 30 टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पादनाचा मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल.
🌾ही योजना सन,2023-24 ते 25,26 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी निविदा प्रक्रियेने राबविण्यात येईल विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे नफा आणि तोटा शेअरिंग मॉडेल किंवा कप अँड कॅप मॉडेल म्हणजेच 80 च 110 नुसार मुख्य सचिवांचे अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पिक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने उचित पर्याय सह राबविण्यात येईल अभिनेत्यातील योजनेसाठी अंमलबजावणी यंत्रांची निवड झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देतेवेळी मागील हंगामामधील राज्यहिस्सा विमा हप्ता रकमेच्या 50 टक्के रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या एस्को अकाउंट मध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर अशा प्रकारे मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिक विमा योजनेत आता शेतकऱ्यांना एक रुपया भरून या ठिकाणी आपला सहभाग नोंदविता येणार आहे.
💁♂️महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थसंकल्प 2023-24 या वर्षापासून शेतकऱ्यांना सर्व पिकांसाठी एक रुपयात Crop Insurance देण्याचे ठरवलेले आहे. या अगोदर काही ठराविक पिकांना Crop Insurance हा विम्याचे संरक्षण देण्यात येत होते. परंतु शेतकरी हिताचा हा नवीन निर्णय शासनाने अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक कोणतेही शेतामध्ये पेरले तरी त्या पिकाला विम्याचे संरक्षण प्राप्त झाल्यामुळे शेतकरी होणाऱ्या नुकसानापासून चिंतामुक्त होणार आहे. एक रुपयात पिक विमा या महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार महाराष्ट्रातील तब्बल सव्वा दोन कोटी अर्जदार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे तब्बल दोन हजार कोटी रुपये वाचणार आहेत.
💁♂️या अगोदर शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये 14 पिकांसाठी व रब्बी हंगामामध्ये सहा पिकांसाठी विमा संरक्षण घेता येत होते.
👉परंतु आता एक रुपयांमध्ये पिक विमा संरक्षण प्रीमियम खरेदी करता येत असल्यामुळे सर्वच पिकांचा विमा काढण्यास शेतकऱ्यांना सूट मिळालेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणावर लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशामध्ये तसेच राज्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सुरुवात ही वर्ष 2016 पासून करण्यात आली होती, या योजनेअंतर्गत खरीप हंगामातील भात,ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग,उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळ, तीळ, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा अशा 14 पिकांना तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, उन्हाळी भात, भुईमूग व रब्बी कांदा अशा सहा पिकांना पीक - विमा सुरू करण्यात आला होता.
👳♀️प्रधानमंत्री पीक - विमा संरक्षण प्रीमियम घेण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील कापूस व कांदा या दोन पिकांसाठी पाच टक्के तर उर्वरित सर्व पिकांसाठी दोन टक्के प्रीमियम आकारण्यात येत होता. तसेच उर्वरित पिकांसाठी व रब्बी हंगामामध्ये दीड टक्के प्रीमियम आकारला जात होता. परंतु आता एक रुपयांमध्ये पीक - विमा संरक्षण प्रीमियम घेता येत असल्यामुळे सर्वच पिकांसाठी शेतकरी पिक विमा संरक्षण प्रीमियम घेऊ शकतात
👉आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2%रक्कम शेतकऱ्याकडून घेतली जात असे.ती रक्कम राज्यसरकार भरणार आहे.
👉आत्ता शेतकऱ्यांवर कोणताच भार असणार नाही.
👉यासाठी राज्य सरकारने 3312₹कोट्टी रुपयांची ची भरीव तरतूद केली आहे
👉विशेष म्हणजे 1जुलै पासून पीक - विमा भरायला सुरुवात होणार आहे
👉1जुलै ते 31जुलै ही पीक -विमा भरण्यासाठी ची अंतिम तारीख असेल
No comments:
Post a Comment
ही वेबसाईट कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क क्रमांक किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती टाकू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा वेबसाईट वर यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद....