Showing posts with label हवामान अंदाज भाकीत 2023?. Show all posts
Showing posts with label हवामान अंदाज भाकीत 2023?. Show all posts

Monday, 24 April 2023

पावसाबाबत भेंडवळची घट मांडणी चे भाकीत जाहीर?

👳‍♀️पावसाबाबत भेंडवळची घट मांडणी चे भाकीत        जाहीर?
💥👳‍♀️ राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेल्या बुलढाणातील भेंडवळची घटमांडणी चे भाकीत जाहीर झाले आहे त्यानुसार  जून महिन्यात कमी पाऊस होईल  जुलै महिन्यात सर्वसाधारण  पाऊस होईल.ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस असून अतिवृष्टी देखील होईल तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडेल पण अवकाळी पाऊस भरपूर पडेल व पिकांचे नुकसान होईल अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. 350 वर्षपासून भेंडवळची घटमांडणी सुरु आहे


🌧️ भेंडवळची भाकणूक (बुलढाणा)-   यंदा पाऊसमान साधारण राहील, पण पिकांचे उत्पादन चांगले होईल आणि दरही चांगला मिळेल.

तसेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात पुन्हा सत्ता जाईल, पण त्यांना संघर्ष करावा लागेल, अशी भाकणूक भेंडवळच्या घटमांडणीत रविवारी सकाळी करण्यात आली.

               

            आजचा हवामान अंदाज
            दिनांक :-24 एप्रिल 2023

🌧️ पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा!            हवामान विभागाने वर्तवला अंदाज

💁‍♂️ गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाका तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. त्यातच राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र होऊ लागल्यामुळे तापमानात घट कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. अशातच हवामान विभागाने या आठवड्यासाठी एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे.

👨🏻‍🌾 अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच विदर्भात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीटीची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. तसेच या आठवड्यामध्ये विदर्भात नागपूरसह बऱ्याच राज्यांमध्ये वातावरणाची स्थिती कायम राहणार आहे.

👉 यामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यास पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.