Showing posts with label कृषी बातमी. Show all posts
Showing posts with label कृषी बातमी. Show all posts

Thursday, 22 June 2023

मराठावाड्यातील या जिल्ह्यातील,पाऊसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 763कोटी 68लाख रु मद्दत वितरित होणार! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाहीत पैसे? Nuksan Bharpai 2022

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 763 कोटीची मदत!
Nuksan Bharpai 2023

👳‍♀️नमस्कार शेतकरी बंधुनो राज्य सरकारने खरीप हंगाम 2022मध्ये झालेल्या नुकसान भरपाई ची मद्दत म्हणून मराठावाड्यातील शेतकऱ्यांना विशेष अनुदान जाहीर केले आहे.

💁‍♂️मागे दिलेल्या नुकसान भरपाई ची रक्कम मराठावाड्यासाठी तटपुंजी रक्कम होती. त्यामुळे मागे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी विशेष पॅकेज जाहीर केले. त्यात त्यांनी मराठावाड्यासाठी 768.63कोटी रुपयांची मद्दत जाहीर केली.

🕵‍♀️मराठावाडयातील नुकसान भरपाईतुन नांदेड, लातूर, आणि हिंगोली या तीन जिल्ह्याला वगळन्यात आले आहे हे विशेष.

🤔नांदेड जिल्ह्यात  सर्वाधिक अतिवृष्टी नुकसान होऊनही नांदेड जिल्ह्याला वगळण्यात आले.

💁‍♂️नांदेड,लातूर, हिंगोली या तीनही जिल्ह्यात नुकसान होऊन वगळंण्यात आले आहे.

💁‍♂️मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात अति पावसाने नुकसान झालेल्या पाच जिल्ह्यातील बारा लाख 73 हजार शेतकऱ्यांना 763 कोटी 68 लाख रुपये याची मदत शासनाने वितरित केली असूनही ही मदत शेतकऱ्यांना च्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे.

📅जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाले होते अतिवृष्टीची नोंद झालेल्या महसूल मंडळात येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना मदत दिली जाते मात्र महसूल मंडळ वगळता एखाद्या गावात अतिवृष्टी होऊन नुकसान होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन अतिवृष्टीच्या निकषा बाहेरील नुकसान झालेल्या शेती पिकाच्या मदतीसाठी राज्य शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

💁‍♂️त्यात मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील 12 लाख 73 हजार शेतकऱ्यांसाठी 763 कोटी 68 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. हा निधी जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

👉मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 226 कोटी 98 लाख 91 हजार रुपयाची मदत निधी प्राप्त झाला आहे. त्यात खालोखाल बीड जिल्ह्याला 195 कोटी 3 लाख 27 हजार रुपये, जालना 134, कोटी 22 लाख रुपये 28000हजार, उस्मानाबाद 137 कोटी 7 लाख 58हजार आणि परभणी जिल्ह्यासाठी 79 कोटी 37 लाख 32हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे.

💁‍♂️निकषाबाहेर जाऊन मदत:-
अतिवृष्टी ही शासनाने घोषित केलेली आपत्ती आहे.महसूल मंडळामध्ये उपलब्ध करून दिलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये 24तासात 65मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावातील पीक नुकसानीचे पंचनामे केले जातात
                     

                                         👇👇👇👇👇👇

                          हेही वाचा :-आता पिक विमा फक्त 1रुपयात येथे पहा?

🤔तीन जिल्ह्याला वगळले:-

👨‍🌾मागील वर्षीच्या पावसाळ्यात नांदेड हिंगोली जिल्ह्यात अनेक वेळा काही गावांमध्ये अतिवर्षट्टी झाली.काही गावामध्ये अतीवर्षट्टी नोंद मंडळाच्या नोंदीत नाही मात्र त्याची दखल घेतली नाही.

👉पिकांचे नुकसान झाले असतानाही नांदेडसह हिंगोली लातूर जिल्ह्यांना या मदतीपासून वगळण्यात आली आहे

 💁‍♂️ 33टक्के पेक्षा अधिक नुकसान असल्यास मदत दिली जाते. मात्र महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद असतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते ही बाब ग्राह्य धरून मद्दत देण्यात आली आहे.

💸मद्दत निधी जिल्ह्यानुसार ?

➡️    औरंगाबाद  :-226.98 कोटी

➡️    बीड           :-195.03कोटी

➡️    जालना      :-134.22कोटी

➡️    उस्मानबाद :-137. O7कोटी

➡️    परभणी     :-70.37कोटी
  
💰    एकूण        :-763.68कोटी


💁‍♂️हा निधी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा-अधिकारी यांना सुपूर्द करण्यात आला आहे. हा निधी येत्या 4-8 दिवसात सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

👉या मद्दती मुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाच वातावरण निर्माण झालं आहे. ह्या मद्दती मुळे शेतकऱ्यांना खते -बियाणं घेण्यासाठी मद्दत होणार आहे. सरकार च्या ह्या मद्दत मुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

💥ह्या पोस्ट ला इथे शेअर करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Tuesday, 13 June 2023

पीक -विमा संरक्षण मिळणार फक्त 1 रुपयांत, मंत्रिमंडळ निर्णय झाला! पीक -विमा 2023 1₹ Crop -Insurence

पीक -विमा संरक्षण मिळणार फक्त 1 रुपयांत, मंत्रिमंडळ निर्णय झाला!
पीक -विमा 2023 1₹ Crop -Insurence


1 रुपयात पीक विमा 
👳‍♀️शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पिक विमा योजने संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण आणि शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी अपडेट आली आहे. मित्रांनो खरीप हंगाम 2023 पासून पंतप्रधान पिक विमा योजनेत आता शेतकऱ्यांना आता एक रुपया भरून या ठिकाणी पिक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे.

1 रुपयात पीक विमा 
💁‍♂️या संदर्भातील मंत्रिमंडळ निर्णय  मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाआहे . मागे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयास मंत्रिमंडळांने मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती असल्यास की यावेळी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली होती. खरीप हंगाम 2023 पासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपये शेतकरी हिस्सा भरून पिक विमा योजने सहभागी होता येणार आहे. तर याच आता मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच याबद्दल शासन निर्णय सुद्धा निर्मित करण्यात येणार आहे.

1 रुपयात पीक विमा 
💁‍♂️शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्यानंतर 2023 मध्ये जो की 1 जुलै 2023 पासून पिक विमा योजनेची सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये शेतकरी बांधवांना 1 रुपये शेतकरी हिसा भरून या ठिकाणी पिक विमा योजने सहभागी होता येणार आहे. 


👉उर्वरित जो हिस्सा असेल तो हिस्सा राज्य सरकार
भरणार आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांसाठी
अतिशय दिलासादायक आणि आनंदाची ही बातमी असणार आहे.

👳‍♀️शेतकरी मित्रांनो केवळ एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यात सर्व समावेश पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय मागे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पी भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून प्रधानमंत्री पिक विमा योजने लाभ देण्यात येईल.      

💁‍♂️या बैठकीचे अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी पिकांचे सरासरी नुकसान काढताना किमान 30 टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पादनाचा मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल.

🌾ही योजना सन,2023-24 ते 25,26 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी निविदा प्रक्रियेने राबविण्यात येईल विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे नफा आणि तोटा शेअरिंग मॉडेल किंवा कप अँड कॅप मॉडेल म्हणजेच 80 च 110 नुसार मुख्य सचिवांचे अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पिक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने उचित पर्याय सह राबविण्यात येईल अभिनेत्यातील योजनेसाठी अंमलबजावणी यंत्रांची निवड झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देतेवेळी मागील हंगामामधील राज्यहिस्सा विमा हप्ता रकमेच्या 50 टक्के रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या एस्को अकाउंट मध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर अशा प्रकारे मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिक विमा योजनेत आता शेतकऱ्यांना  एक रुपया भरून या ठिकाणी आपला सहभाग नोंदविता येणार आहे.

💁‍♂️महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थसंकल्प 2023-24 या वर्षापासून शेतकऱ्यांना सर्व पिकांसाठी एक रुपयात Crop Insurance देण्याचे ठरवलेले आहे. या अगोदर काही ठराविक पिकांना Crop Insurance हा विम्याचे संरक्षण देण्यात येत होते. परंतु शेतकरी हिताचा हा नवीन निर्णय शासनाने अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक कोणतेही शेतामध्ये पेरले तरी त्या पिकाला विम्याचे संरक्षण प्राप्त झाल्यामुळे शेतकरी होणाऱ्या नुकसानापासून चिंतामुक्त होणार आहे. एक रुपयात पिक विमा या महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार महाराष्ट्रातील तब्बल सव्वा दोन कोटी अर्जदार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे तब्बल दोन हजार कोटी रुपये वाचणार आहेत.

💁‍♂️या अगोदर शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये 14 पिकांसाठी व रब्बी हंगामामध्ये सहा पिकांसाठी विमा संरक्षण घेता येत होते.

👉परंतु आता एक रुपयांमध्ये पिक विमा संरक्षण प्रीमियम खरेदी करता येत असल्यामुळे सर्वच पिकांचा विमा काढण्यास शेतकऱ्यांना सूट मिळालेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणावर लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशामध्ये तसेच राज्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सुरुवात ही वर्ष 2016 पासून करण्यात आली होती, या योजनेअंतर्गत खरीप हंगामातील भात,ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग,उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळ, तीळ, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा अशा 14 पिकांना तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, उन्हाळी भात, भुईमूग व रब्बी कांदा अशा सहा पिकांना पीक - विमा सुरू करण्यात आला होता.

👳‍♀️प्रधानमंत्री पीक - विमा संरक्षण प्रीमियम घेण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील कापूस व कांदा या दोन पिकांसाठी पाच टक्के तर उर्वरित सर्व पिकांसाठी दोन टक्के प्रीमियम आकारण्यात येत होता. तसेच उर्वरित पिकांसाठी व रब्बी हंगामामध्ये दीड टक्के प्रीमियम आकारला जात होता. परंतु आता एक रुपयांमध्ये पीक - विमा संरक्षण प्रीमियम घेता येत असल्यामुळे सर्वच पिकांसाठी शेतकरी पिक विमा संरक्षण प्रीमियम घेऊ शकतात

👉आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2%रक्कम शेतकऱ्याकडून घेतली जात असे.ती रक्कम राज्यसरकार भरणार आहे.

👉आत्ता शेतकऱ्यांवर कोणताच भार असणार नाही.

👉यासाठी राज्य सरकारने 3312₹कोट्टी रुपयांची ची भरीव तरतूद केली आहे

👉विशेष म्हणजे 1जुलै पासून पीक - विमा भरायला सुरुवात होणार आहे

👉1जुलै ते 31जुलै ही पीक -विमा भरण्यासाठी ची अंतिम तारीख असेल 

Monday, 8 May 2023

फेरफार उतारा ऑनलाईन कसा डाऊनलोड करायचा?

 फेरफार उतारा ऑनलाईन कसा डाऊनलोड करायचा?



गावपातळीवर फेरफार म्हणजेच गाव नमुना-6 अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या जमीन अधिकार अभिलेखात जे बदल होतात, त्याची नोंद फेरफारात ठेवली जाते.

फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर माहिती दिलेली असते.


पण तुम्हाला माहित आहे का, तुम्ही घरबसल्या मोबाईलवर डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार उतारा डाऊनलोड करू शकता. तशी सुविधा महसूल विभागानं 1 ऑगस्ट 2021 पासून उपलब्ध करून दिली आहे.


हा फेरफार उतारा डाऊनलोड कसा करायचा, याची माहिती आपण आता जाणून घेऊया.


फेरफार उतारा कसा काढायचा?

1) फेरफार उतारा काढण्यासाठी तुम्हाला digitalsatbara.mahabhumi.gov.in या वेबसाईट वर जायचं आहे.

2)यानंतर महसूल विभागाचं आपला 7/12 नावाचं एक  नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

3)तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, इथं येऊन सातबारा, आठ-अ काढला असेल,तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.

4)पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असेल, तर  मोबाईल क्रमांक वापरूनही तुम्हाला इथल्या सेवांचा लाभ घेता येतो.

4)त्यासाठी OTP Based Login या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

5)त्यानंतर Enter Mobile Number च्या खालच्या  रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मग Send OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

5)तुम्ही या पर्यायावर क्लिक केलं की, OTP sent on your mobile असा मेसेज तिथं येईल.

7)याचा अर्थ तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच One Time Password म्हणजेच काही आकडे  पाठवलेले असतात, ते जसेच्या तसे तुम्हाला Enter    OTP च्या खालच्या रकान्यात टाकायचे आहेत.

8)त्यानंतर Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

9)पुढे तुमच्यासमोर आपला सातबारा नावानं एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed eFerfar, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसतील.

10)यातल्या Digitally signed eFerfar या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

11)त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीत फेरफार असं शीर्षक असलेलं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. 

12)यामध्ये सगळ्यात शेवटी सूचना दिलेली आहे की, Rs.15 will be charged for download of every eferfar. This amount will be deducted from available balance.

13)याचा अर्थ फेरफार उताऱ्यासाठी 15 रुपये चार्ज केले जातील, ते तुमच्या उपलब्ध बॅलन्समधून कापले जातील.

14)आता आपण नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे आपल्या खात्यात इथं काही बॅलन्स नसतं. त्यामुळे सगळ्यात आधी खात्यात पैसे जमा करणं गरजेचं असतं.

15)ते कसे करायचे तर खाली असलेल्या रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

16)तिथं एंटर अमाऊंट समोर 15 रुपये एवढा आकडा टाकायचा आहे आणि मग पे नाऊवर क्लिक करायचं आहे.

17)त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तिथं असलेल्या छोटा डब्ब्यात टिक करायचं आहे आणि मग कन्फम बटन दाबायचं आहे.

18)त्यानंतर हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम ॲप असेल तर त्याद्वारे जमा करता येऊ शकतात. तसे वेगवेगळे पर्याय इथे दिलेले आहेत.

19)पेमेंटसाठीची ही माहिती भरली की तुमच्या मोबाईलववर एक ओपीटी पाठवला जातो. तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे.

20)त्यानंतर स्क्रीनवर your payment was successful याचा अर्थ तुम्ही 15 रुपये जमा केले आहेत, असा मेसेज येतो. इथं असलेल्या continue या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

21)त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीतल्या सातबारा उताऱ्याचं पेजवर तिथं ओपन होईल. 

22)पण आपल्याला फेरफार काढायचा असल्याने Digitally signed eFerfar यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

23)त्यानंतर तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव, फेऱफार नंबर टाकायचा आहे. 

24)तुमच्या सातबारा उताऱ्यावरील हा फेरफार क्रमांक नमूद केलेला असतो.

25)शेवटी डाऊनलोड पर्यायावर क्लिक करायचं आहे.

26)त्यानंतर RS.15 will be deducted from your available balance for Ferfar download, असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. त्याखालच्या ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार तिथं डाऊनलोड होईल.

27)यात सुरुवातीला फेरफाराचा क्रमांक, त्यानंतर अधिकाराच्या स्वरुपात काय बदल झाला, याची सविस्तर माहिती दिलेली असते. पुढे परिणाम झालेले गट क्रमांक आणि अधिकाऱ्याचं नाव आणि शेरा दिलेला असतो.

28)या उताऱ्यावर शेवटी स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, हा अभिलेख फेरफाराच्या डिजिटल स्वाक्षरीत 21-07-2021 रोजी डेटा वरून तयार झाल्यामुळे यावर कोणाच्याही सही-शिक्क्याची आवश्यकता नाही.

 आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा 



3)    प्रकारच्या सुविधा

आपली चावडी उपक्रमाअंतर्गत नागरिकांना घरबसल्या डिजिटल सुविधा मिळणार आहेत.

सध्या तीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

👉यात नोटीस पहा या रकान्यात नागरिक फेरफाराची नोटीस पाहू शकतात. ही माहिती आपण नुकतीच पाहिली आहे.

👉त्यानंतर फेरफाराची स्थितीमध्ये फेरफाराच्या नोटीशीवर कुणी हरकत घेतली आहे का, हरकतीचा शेरा आणि तिचा तपशील दिलेला असतो. हरकतीसाठी 15 दिवसांचा अवधी दिला जातो. या कालावधीत कुणी

हरकत घेतली नसेल तर फेरफारावरील नोंद प्रमाणित केली जाते आणि मग ती सातबाऱ्यावर नोंदवली जाते.

👉त्यानंतर तिसरा पर्याय आहे मोजणीची नोटीस. यात तुमच्या गावात जमीन मोजणी कुणी आणली आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.

💥यात मोजणीचा प्रकार, मोजणीचा रेजिस्ट्रेशन क्रमांक, तालुका आणि गावाचं नाव, ज्या गट क्रमांकावर मोजणी करायची आहे तो गट क्रमांक, मोजणीचा दिनांक आणि मोजणीस येणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक दिलेला असतो.

💥यानंतर शेतजमिनीचे लगतचे खातेदार आणि सहधारक यांची माहिती नमूद केलेली असते.