महिला सन्मान बचत पत्रात करा गुंतवणूक मिळेल चक्री वाढ व्याज! Mahila Sanman Saving Certificate -2023
👮 केंद्र सरकारची डाक कार्यालयामार्फत नवीन बचत योजना सुरू
💁♂️नमस्कार, बंधू आणि भगिनींनो ही योजना केंद्र सरकारने आणली आहे तरी ही योजना आपल्या महिला भगिनी साठी खूप महत्वाची आहे.
💁ही योजना फक्त महिला साठी आहे. विशेष म्हणजे या योजनेतून परतवा जास्त असल्याने प्रत्येक महिलेने याचा अवश्य लाभ घ्यावा. ही योजना आपल्या पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहे.
💁महिलांच्या सक्षमिकारणासाठी आणि महिलांच्या आर्थिक गुंतवणूक वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत डाक कार्यालयात आर्थिक गुंतवणूक केल्यास वार्षिक 7.5% व्याज मिळणार आहे शिवाय हे व्याज चक्रवाढ पद्धतीने असणार आहे त्यामुळे महिलांना आर्थिक लाभ होणार हे मात्र नक्की आहे.
💁महिलांचे सक्षमीकरण व्हावे म्हणून शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचा महिलांना चांगला लाभ होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
🏠केंद्र सरकारने सर्व डाक कार्यालयामार्फत महिला सन्मान बचत पत्र ही नवीन बचत योजना एप्रिल महिन्यापासून सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून महिला ह्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याबरोबरच गुंतवणुकीत महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश असल्याचे डाक कार्यातून सांगण्यात आले.
🌅या योजनेतुन राज्यतील अधिका - अधिक महिलांना लाभ घ्यावा म्हणून डाक कार्यालयाच्या वतीने 10 ते 30 जून या कालावधीत विशेष मोहीम व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या या योजनेचे अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन डाकघर अधीक्षक महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
💁♂️दोन वर्ष सुरू राहणार ही योजना:-
महिला सन्मान बचत पत्र योजना ही महिला आणि मुलींच्या आर्थिक प्रगतीसाठी आहे.एका मुलीच्या नावावर अथवा मुलीच्या वतीने तिच्या नावावर तिचे पालक बचत पत्र घेऊ शकतात. ही योजनेची मुदत दोन वर्ष आहे या बचत पत्रात किमान 1हजारापासून ते 2 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते.
💰एका महिलेच्या / मुलीच्या नावावर कमाल 2 लाखापर्यंत कितीही बचत पत्र घेता येतील परंतु दोन खात्यात किमान तीन महिन्याचे अंतर असले पाहिजे बचत पत्रात व्याजदर हा वार्षिक 7.5% राहणार आहे शिवाय हे व्याज चक्रवाढ पद्धतीने असेल एका वर्षानंतर 40% रक्कम काढता येऊ शकते.
💁महिला सम्मान बचत पत्र योजनेच अकाउंट उघडण्यासाठी खाली दिलेल्या डॉक्यूमेंट्स ची आवश्यकता असणार आहे
1) खाते उघडण्याचा चा फार्म (Post Officeमधून मिळेल )
2)रंगीत पासपोर्ट साइज फोटो
3)आधार कार्ड
4)पैन कार्ड
💁♂️महिला सन्मान बचत पत्रा मुळे किती पैसा मिळणार?
👉महिला सन्मान बचत पत्र योजने मध्ये जमा पैसा वर सरकार 7.50% वर्ष्याला व्याज देणार. व्याज ही प्रत्येक तीन महिन्याला चक्रवाढ व्याज पद्धतीने मिळणार.
👉आपन जेवढे जास्त पैसा जमा करणार , तेवढे अधिक पैसा आपल्यला 2 वर्ष्याच्या नंतर आपल्याला वापस मिळणार. किती पैसे जमा केल्यावर किती पैसे वापस मिळणार. हे खाली आपण पाहू शकता.
»1000/-रु जमा केल्यावर, 2 वर्षानंतर , 1160/- रु वापस मिळणार
»2000/-रु जमा केल्यावर 2 वर्ष्यानंतर , 2320/- रु वापस मिळणार.
»3000/-रु जमा केल्यावर 2 वर्ष्यानंतर , 3481/- रु वापस मिळणार
»5000/-रु रुपए जमा केल्यावर 2 वर्ष्यानंतर , 5801/-रु वापस मिळणार
»10000/-रु जमा केल्यावर 2 वर्ष्यानंतर , 11606/- रु वापस मिळणार.
»20000/- रु जमा केल्यावर 2 वर्ष्यानंतर , 23204/- रु वापस मिळणार.
»50000/- रु जमा केल्यावर 2 वर्ष्यानंतर , 58011/- रु वापस मिळणार
»100000/-लाख जमा केल्यावर 1 लाख 16 हजार 22 रु वापस मिळणार
»200000/- लाख जमा केल्यावर 2 लाख 32 हजार 44 रु वापस मिळणार.
💁♂️महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती मोहीम:-
💁महिला बचत पत्र योजनेसाठी राज्यतील प्रत्येक जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम 10 ते 30 जून या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील प्रत्येक गावात जागृती मेळावे घेण्यात येणार आहेत यात योजनेची माहिती देण्यात येणार आहे. पोस्ट कार्यालयाच्या योजनेची माहिती दिली जाणार आहे.तसेच पात्र लाभार्थीचे तात्काळ नवीन खाते उघडण्यात येणार आहे.
ह्या पोस्ट इथे शेअर करा 👇👇👇👇👇👇