नोटबंदीची घोषणा ! 2000 हजारांच्या नोटा चलनातून मागे घेणार, RBI चा निर्णय.....अशा बदलून मिळणार नोटा जाणून घ्या काय आहे प्रक्रिया....
👇👇👇👇👇👇👇
💰दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या नोटांची छपाई बंद केली जाणार असल्याची रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी देण्यात आली. दरम्यान दोन हजाराच्या नोटा बँकांत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
👉केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती. त्यावेळी अभूतपूर्व चलन तुटवडा निर्माण झाला होता. हा तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता याही नोटा चलनातून काढून घेतल्या जाणार आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये आरबीआय कायद्याच्या कलम 24(1) अंतर्गत दोन हजाराच्या नोटा बाजारात आणल्या गेल्या होत्या.
👉बाजारातील चलनाचा तुटवडा कमी झाल्यानंतर वर्ष 2018-19 मध्ये 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. सध्या बाजारात असलेल्या दोन हजाराच्या 89 टक्के नोटांची छपाई मार्च 2017 पूर्वी झालेली आहे. या नोटांचे मार्च 2018 मध्ये असलेले 6.73 लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य 31 मार्च 2023 रोजी 3.62 लाख कोटी रुपयांपर्यंत कमी झालेले आहे. एकूण चलनात असलेल्या नोटांच्या तुलनेत दोन हजारांच्या नोटांची टक्केवारी केवळ 10.8 टक्के इतकी असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.
1) एकावेळी 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून दिल्या जाणार.....
बाजारात अन्य किमतीच्या नोटांचे पुरेसे प्रमाण आहे तसेच दोन हजार रुपयांच्या नोटांचा दैनंदिन जीवनात फारसा वापर केला जात नाही, यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्या जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. ठराविक मुदतीपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर जनतेला करता येणार आहे. लोकांनी बँकांत दोन हजार रुपयांची नोट जमा केल्यानंतर त्यांना तितक्याच किमतीच्या इतर चलनी नोटा दिल्या जातील. 23 मे पासून 30 सप्टेंबर पर्यंत जनतेला नोटा बदलून घेता येतील. एकावेळी 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून दिल्या जाणार आहेत.
2) 30 सप्टेंबर 2023 ही दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची शेवटची तारीख....
👉केंद्रात पहिल्यांदा मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारने दोनच वर्षांनी म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी केली होती. त्यावेळी पाचशे व एक हजार रुपयांच्या जुन्या चलनी नोटा बाद करण्यात आल्या होत्या. यानंतर आता साडेसहा वर्षांनी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्यात आल्या आहेत. दरम्यान एटीएम व अन्य माध्यमातून लोकांना दोन हजार रुपयांच्या नोटा देणे बंद करावे, असे निर्देश रिझर्व्ह बॅंकेने सर्व बँकांना दिले आहेत. 30 सप्टेंबर 2023 ही दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर पुढे काय होणार, हे अद्यापपर्यंत आरबीआयने सांगितलेले नाही.
3) नोटा बदण्यासाठी काय करावे :-
👉तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर टेन्शन घेण्याची गरज नाही. ही नोट अजूनही वैध आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्हाला बँक किंवा एटीएममधून 2000 रुपयांच्या नव्या नोटा काढता येणार नाहीत. यासोबतच तुम्हाला बँकेत तुमच्या जवळ असणा-या 2000 रुपयांच्या जुन्या नोटाही बदलून घ्याव्या लागतील. यासाठी रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबरची मुदत दिली आहे. यानंतर काय होणार याबाबत आरबीआयने अद्याप काहीही सांगितलेले नाही.
4)नोव्हेंबर 2016 च्या नोटबंदीनंतर 2000 नोट व्यवहारात आली :-
👉8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने नोटबंदीची घोषणा केली होती. यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्यात आली. त्या बदल्यात, केंद्रीय रिझर्व्ह बँकेने 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. मात्र, काही वर्षांतच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करून त्याचे व्यवहारातील चलन कमी करण्यात झाले. बहुतांश एटीएममधून या नोटा गायब झाल्या. आता रिझर्व्ह बँकेने या नोटा मागे घेण्याची घोषणा केली आहे.
👉रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 2018-19 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. 2000 मूल्याच्या सुमारे 89 टक्के नोटा मार्च 2017 पूर्वी जारी करण्यात आल्या होत्या.
💵💸शिर्डीतील साई संस्थानचं भाविकांना आवाहन:- दोन हजार रुपयांच्या नोटा दानपेटीत टाकू नका; आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्याचा परिणाम...
🧐बँकेने 2000 च्या नोटा परत न घेतल्यास येथे करा तक्रार
🖊️ रिझर्व बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय घेतला आहे तसेच आरबीआयने बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा देणे तात्काळ बंद करण्याचा सल्ला दिला आहे
⏲️ रिझर्व बँकेने 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहे मात्र बँकेने नोटा परत घेतल्या नाहीतर तुम्ही संबंधित बँकेच्या तक्रार विभागात तक्रार करू शकता
👉 पहा कुठे करता येईल तक्रार
💥जर तक्रार दाखल करून 30 दिवसांमध्ये बँकेने उत्तर किंवा तोडगा काढला नाही तर तुम्ही रिझर्व बँकेच्या rbi.org.in/Scripts/Complaints.aspx या पोर्टलवर तक्रार करू शकता.
💥ज्या नागरिकांच बँकेत खाते नाही अशा व्यक्तींकरता नोटा बदलून घेण्यासाठी वीस हजार रुपयांची मर्यादा असणार आहे याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही बँकेतून नोटा बदलून मिळू शकतात.
👉नोटबंदीची घोषणा!2000 हजारांचा नोटा चलनातून मागे घेणार, RBI
No comments:
Post a Comment
ही वेबसाईट कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क क्रमांक किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती टाकू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा वेबसाईट वर यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद....