Wednesday, 26 April 2023

मोठा निर्णय! रेती, वाळू धोरणाची अंमलबजावणी 'या' तारखेपासून होणार..

💥💥मोठा निर्णय! रेती, वाळू धोरणाची अंमलबजावणी 'या' तारखेपासून होणार..


💁🏻‍♂️ राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती, वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्र दिनी (1 मे) या धोरणाची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार असून सर्वसामान्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून रेती/वाळू मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

🗣️ मंत्री विखे पाटील म्हणाले की,  या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येण्यास मदत होणार आहे. वाळू लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच 600 रुपयात वाळू उपलब्ध होणार आहे. या धोरणानुसार स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. 

👨🏻‍💼 याशिवाय जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इत्यादी खर्च देखील आकारण्यात येतील. वाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपो पर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल. ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथूनच या रेतीची विक्री करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महसूल मंत्री यांनी केल्या आहेत.

🧐 ​नदी पात्रातील वाळू गटाचे निरीक्षण करण्याची कार्यवाही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती करेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरिय वाळू संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती वाळू गट निश्चित करून, त्या गटासाठी ऑनलाईन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल. 

📍 जिल्हास्तरीय संनियत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक किंवा पोलिस आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी, भू-विज्ञान व खनिकर्म विभाग, भूजल सर्वेक्षण तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील. ही समिती वाळू डेपोमध्ये वाळू साठा उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्चित करतील. तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशांचे पालन होईल, याची दक्षता घेण्यात येईल.


वाळू लिलाव आता बंद होणार?

Monday, 24 April 2023

पावसाबाबत भेंडवळची घट मांडणी चे भाकीत जाहीर?

👳‍♀️पावसाबाबत भेंडवळची घट मांडणी चे भाकीत        जाहीर?
💥👳‍♀️ राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेल्या बुलढाणातील भेंडवळची घटमांडणी चे भाकीत जाहीर झाले आहे त्यानुसार  जून महिन्यात कमी पाऊस होईल  जुलै महिन्यात सर्वसाधारण  पाऊस होईल.ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस असून अतिवृष्टी देखील होईल तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडेल पण अवकाळी पाऊस भरपूर पडेल व पिकांचे नुकसान होईल अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. 350 वर्षपासून भेंडवळची घटमांडणी सुरु आहे


🌧️ भेंडवळची भाकणूक (बुलढाणा)-   यंदा पाऊसमान साधारण राहील, पण पिकांचे उत्पादन चांगले होईल आणि दरही चांगला मिळेल.

तसेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात पुन्हा सत्ता जाईल, पण त्यांना संघर्ष करावा लागेल, अशी भाकणूक भेंडवळच्या घटमांडणीत रविवारी सकाळी करण्यात आली.

               

            आजचा हवामान अंदाज
            दिनांक :-24 एप्रिल 2023

🌧️ पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा!            हवामान विभागाने वर्तवला अंदाज

💁‍♂️ गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाका तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. त्यातच राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र होऊ लागल्यामुळे तापमानात घट कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. अशातच हवामान विभागाने या आठवड्यासाठी एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे.

👨🏻‍🌾 अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच विदर्भात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीटीची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. तसेच या आठवड्यामध्ये विदर्भात नागपूरसह बऱ्याच राज्यांमध्ये वातावरणाची स्थिती कायम राहणार आहे.

👉 यामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यास पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.

Friday, 21 April 2023

माजी सैनिकांना घेता येणार 'या' विद्यापीठाकडून ‘बीए’ ची पदवी?

📝 माजी सैनिकांना घेता येणार 'या'                   विद्यापीठाकडून ‘बीए’ ची पदवी?
💁🏻‍♂️👨‍✈️ माजी सैनिकांना विविध नोकऱ्यांसाठी कला शाखेतून बीए (मानव संसाधन व्यवस्थापन) (BA (HRM)) पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात करार करण्यात आला आहे. या कराराद्वारे माजी सैनिकास आंध्र विद्यापीठाद्वारे कला शाखेतून बीए (मानव संसाधन व्यवस्थापन) पदवी प्रमाणपत्र मिळवता येणार आहे.

💥👨‍✈️माजी सैनिकास निवृत्तीच्या वेळी प्राप्त झालेले शैक्षणिक प्रमाणपत्र काही संस्था मान्य करत नाहीत. अशा माजी सैनिकांना कला शाखेमधून बीए (मानव संसाधन व्यवस्थापन) पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यासाठी हा करार झालेला आहे. हे पदवी प्रमाणपत्र केंद्र व राज्य शासन तसेच इतर सार्वजनिक उपक्रमाच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त आहे.

💥👨‍✈️माजी सैनिकांसाठी कला शाखेतून पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी  पात्रता व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अर्जदार माजी सैनिक असावा. अर्जदाराचे शिक्षण इयत्ता बारावी किंवा समतुल्य शिक्षण किंवा भारतीय आर्मी, नेव्ही, एअर फोर्सद्वारा प्राप्त शिक्षणाचे विशेष प्रमाणपत्र असावे. माजी सैनिकांची सेवा पंधरा वर्षापेक्षा कमी नसावी. दि. 1 जानेवारी 2010 नंतर निवृत्त झालेला असावा. 

👮 माजी सैनिक इयत्ता दहावी पास असेल तर अशा उमेदवारांना 5 वर्षांचा अभ्यासक्रम (2 वर्ष 12वी + 3 वर्ष पदवी) लागू राहील. या अभ्यासक्रमाचे शुल्क 12 हजार 500 रुपये असून अर्जदाराने आपले अर्ज फक्त एप्रिल किंवा ऑक्टोबर महिन्यातच संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी www.ksb.gov.in या संकेतस्थळी भेट देऊन circulars / publications पहावे किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास भेट द्यावी,असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे...

Wednesday, 19 April 2023

नोकरी:- तब्बल 3055 जागांसाठी भरती सुरू...?

🛄 नोकरी:- तब्बल 3055 जागांसाठी भरती सुरू...
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाच्या 3055 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील सविस्तर जाहिरात वाचून, शैक्षणिक पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

📋परीक्षेचे नाव:- नर्सिंग अधिकारी भरती सामान्य पात्रता परीक्षा (NORCET)

🎯पदाचे नाव व जागा:- नर्सिंग ऑफिसर (3055 जागा)

🔔शैक्षणिक पात्रता:- B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा+किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.


📝 ऑनलाईन अर्ज करा:-

📅  ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-5 मे 2023

💰 फी : -जनरल/ओबीसी: 3000 रु./- [एससी/एसटी/ईडब्ल्यूएस: 2400 रु./-, पीडब्ल्यूडी: फी नाही]

👤वयोमर्यादा :- 05 मे 2023 रोजी 18 ते 30 वर्षे          [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी:03 वर्षे सूट]

📍 नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत

Tuesday, 18 April 2023

केंद्र सरकारची मोठी घोषणा - आता जनधन खातेधारकांना मिळणार १० हजार रुपये?

👳‍♀️केंद्र सरकारची मोठी घोषणा - आता जनधन           खातेधारकांना मिळणार १० हजार रुपये?


👌 जनधन खातेधारकांना केंद्र सरकारकडून दहा हजार रुपये दिले जात आहेत. त्याचबरोबर सरकारने या खात्यावर विम्याची सुविधाही दिली आहे. या खात्यावर सरकारकडून ओव्हरड्राफ्ट सुविधाही दिली जाईल असे सरकारने सांगितले आहे. 

💁‍♂️ पहा आणखी काय सांगितले सरकारने

💰 या सुविधेअंतर्गत तुमच्या खात्यात एकही रुपया नसला तरी तुम्ही १० हजार रुपये काढू शकता, याआधी ही सुविधा फक्त ५ हजार रुपये होती मात्र आता सरकारने हीच मर्यादा वाढवून १० हजार रुपये केली आहे. 

🖊️ मात्र यासाठी सरकारने काही अटी ठेवल्या आहेत, जनधन खात्यावर कमीत कमी सहा महिन्यांसाठी समाधानकारक व्यवहार झालेले असावेत. त्याचबरोबर खातेधारकांचे दुसऱ्या कोणत्याही बँकेत बचत खाते नसावे असे केंद्र सरकारने म्हटले आहे. 

🙏 जनधन खातेधारकांना मिळणार १० हजार रु 
 हि माहिती सर्व नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा 


Monday, 17 April 2023

मुख्यमंत्री सहायता निधीत मोठा बदल - पहा कसे आहेत नवे बदल.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा?

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा?


मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. ८६५०५६७५६७
Email id:aao.cmrf-mh@gov.in

राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे.

जास्तीतजास्त शेअर करा, गरजू रुग्णांपर्यंत पर्यंत पोहोचवा!

■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
१. अर्ज ( विहीत नमुन्यात)
२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.
(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.) 
४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक
५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. 
७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.
८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी नढउउ / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
          
                
● अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवावी.

Email id:aao.cmrf-mh@gov.in

● व त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.

■ *मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे.


१. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष २ ते ६),
२. हृदय प्रत्यारोपण
३. यकृत प्रत्यारोपण
४. किडणी प्रत्यारोपण
६. बोन मॅरो प्रत्यारोपण
५. फुफ्फुस प्रत्यारोपण
७. हाताचे प्रत्यारोपण
८. हिप रिप्लेसमेंट
९. कर्करोग शस्त्रक्रिया
१०. अपघात शस्त्रक्रिया
११. लहान बालकांचे शस्त्रक्रिया
१२. मेंदूचे आजार
१३. हृदयरोग
१४. डायलिसिस 
१५. अपघात
१६. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)
१७. नवजात शिशुंचे आजार
१८. गुडघ्याचे प्रत्यारोपण 
१९. बर्न रुग्ण
२०. विद्युत अपघात रुग्ण

या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी* उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : -८६५०५६७५६७
संपर्क क्र. ०२२-२२०२६९४८ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती व
रुग्णालयांची यादी वेबसाईटवर आहे.

आपले नम्र,:-
मंगेश नरसिंह चिवटे,
कक्ष प्रमुख,
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय.

रोहित वायभासे वैदकीय सहाय्यक:- 8907776009/ 9067171514


वैद्यकीय मदतीसाठी खालील लिंक वर क्लिक करून रुग्णाचा तपशील पाठवा

 मुख्यमंत्री सहायता निधीत मोठा बदल - पहा कसे आहेत नवे बदल

🧐 तुम्हाला माहिती असेल, रुग्णांची गरज ओळखून राज्य सरकारने मुख्यमंत्री सहायता निधी पुन्हा सुरू केला आहे. या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या लोकांना दुर्धर आजारांवर उपचार घेणे शक्य होत नाही. 

💰 त्यासाठी गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते. यामध्ये विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मदत दिली जाते. 

👉 पहा या योजनेविषयी आणखी

▪️ सुरुवातीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप धावपळ करावी लागत होती अशा वेळी होणारा त्रास कमी करण्यासाठी आता राज्य सरकारने या योजनेत आणखी सुधारणा केली आहे. 

▪️ आता आपल्याला अर्ज करण्यासाठी 8650567567 या नंबरवर मिस्ड कॉल दिल्यानंतर मोबाइलवरच अर्जाची लिंक मिळेल. त्याद्वारे अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह पाठवायचा आहे. 

▪️ मिस्डकॉल दिल्यानंतर अर्जाची लिंक एसएमसएसद्वारे मोबाइलवर मिळेल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अर्ज डाउनलोड होईल. 

▪️ या अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह पोस्टाद्वारे किंवा स्कॅन करून पीडीएफ स्वरुपात cmrf.maharashtra.gov.inया मेलवर पाठविता येईल.
💥मुख्यमंत्री सहायता निधीत मोठा बदल झाला

Sunday, 16 April 2023

तुम्हाला माहितीये? PAN Card वरील १० नंबरांमध्ये लपलंय तुमचं नाव, जाणून घ्या?

तुम्हाला माहितीये? PAN Card वरील १० नंबरांमध्ये लपलंय तुमचं नाव, जाणून घ्या?
पॅन कार्ड  महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या पॅन कार्डवर १० अंकी एक नंबर पाहिला असेल. त्यावर सर्व प्रकारची माहिती असते. या अंकांमधील माहिती आयकर विभाग ट्रॅक करत असते. हे लक्षात घेऊन विभाग प्रत्येक व्यक्तीला पॅन कार्ड जारी करतो. मात्र, पॅन कार्डवर लिहिलेले क्रमांक समजणारे किंवा ओळखणारे फार कमी लोक आहेत. आम्ही तुम्हाला पॅन कार्डवर लिहिलेल्या अल्फान्यूमेरिक नंबरचा अर्थ काय असतो ते सांगत आहोत.

अक्षरांमध्ये लपलंय तुमचं आडनाव:-

पॅन कार्डावर कार्डधारकाचं नाव आणि जन्म तारीख लिहिलेली असते. परंतु पॅन कार्डच्या नंबरमध्ये तुमचं आडनावही असतं. पॅन कार्डाचं पाचवं डिजिट तुमचं आडनाव दर्शवतं. इन्कम टॅक विभाग कार्डधारकाच्या आडनावालाच आपल्या डेटामध्ये नोंद करून ठेवतं. यासाठीच अकाऊंट नंबरपमध्ये त्याची माहिती असते. याची माहिती टॅक्स डिपार्टमेंट कार्डधारकाला देत नाही.

टॅक्सपासून क्रेडिट कार्डावर असते नजर:-

पॅन कार्ड क्रमांक हा १० अंकी खास क्रमांक आहे, जो लॅमिनेटेड कार्डच्या स्वरूपात येतो. जे लोक पॅन कार्डसाठी अर्ज करतात त्यांना आयकर विभाग ते जारी करतो. पॅनकार्ड बनल्यानंतर त्या व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार विभागाच्या पॅनकार्डशी लिंक केले जातात. यामध्ये कर भरणा, क्रेडिट कार्डद्वारे होणारे आर्थिक व्यवहार हे सर्व विभागाच्या देखरेखीखाली होते.

विभाग ठरवतो नंबर:-

 नंबरच्या सुरुवातीचे तीन डिजीट इंग्रजी अक्षरं असतात. हे AAA पासून ZZZ पर्यंत कोणतेही असू शकतात. सध्या सुरु असलेल्या सीरिजनुसार ते ठरवले जातात. विभाग आपल्या प्रमाणे ते ठरवत असतं. पॅन नंबरचं चौथं डिजीटही एक अक्षर असतं. परंतु ते कार्डधारकाचं स्टेटस सांगतं. यामध्ये चौथं डिजीट खालील पैकी काहीही असू शकतं.


*P - सिंगल पर्सन
*F - फर्म
*C - कंपनी
*A - एसोसिएशन ऑफ पर्सन 
*T - ट्रस्ट
*H - हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली
*B - बॉडी ऑफ इंडिविज्युअल 
*L - लोकल
*J - आर्टिफिशिअल ज्युडिशिअल पर्सन
*G - सरकारसाठी

पाचव्या डिजीटमध्ये आडनाव:-

पॅन कार्डाच्या पाचव्या डिजीट म्हणजे इंग्रजी अक्षरच असतं. ते तुमच्या आडनावाचं पहिलं अक्षर असतं. यानंतर पॅन कार्डात चार क्रमांक असतात. ते ०००१ पासून ९९९९ पर्यंत कोणतेही असू शकतात. तुमच्या पॅन कार्डाचे नंबर्स सीरिज दर्शवतात. याचं अखेरचं डिजीट एक अल्फाबेट असतं, जे कोणतंही लेटर असू शकतं. दरम्यान, आर्थिक व्यवहारासांठी पॅन कार्ड आवश्यक आहे. तुम्ही तुमचा पत्ता बदलला तरी पॅन कार्डाचा क्रमांक बदलत नाही. पॅन कार्ड हे एका आयडीच्या स्वरूपातही वापरू शकता.


आमच्या व्हाट्सअँप 👇 ग्रुप ला जॉईन व्हा

ह्या पोस्ट ला इथे 👇👇👇👇👇शेअर करा 

Thursday, 13 April 2023

पावसाचा नवा अंदाज जाहीर असा असणार राज्यातील मान्सून?

पावसाचा नवा अंदाज जाहीर असा असणार राज्यातील मान्सून:=

सन २०२३ साठीचा मान्सून चा अंदाज जाहीर, पहा कसा असेल पावसाळा स्कायमेट या भारतातील अग्रगण्य व अचूक हवामान अंदाज वर्तविनाऱ्या कंपनीने Monsoon forecast 2023 साठी मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे.

स्कायमेट या संस्थेच्या माध्यमातून चालू वर्षात मान्सून 94% (+/-5% च्या त्रुटी मार्जिनसह) अर्थात सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तविली आहे. पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या दीर्घ कालावधीसाठी 868.6mm ची दीर्घ कालावधीची सरासरी अर्थात LPA च्या 90-95% म्हणजेच सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग यांच्या म्हणण्यानुसार, नैऋत्य मोसमी पाऊस गेल्या सलग 4 हंगामांमध्ये सामान्य/सामान्य पेक्षा जास्त राहिला आहे मात्र आता लानिनो संपला आहे.

मुख्य सागरी आणि वातावरणीय चल ENSO शी सुसंगत आहेत. तटस्थ परिस्थिती. एलनिनोची शक्यता वाढत आहे आणि पावसाळ्यात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. एलनिनोचे पुनरागमन हे मान्सूनला कमकुवत करते.

या वर्षी एलनिनो व्यतिरिक्त, मान्सूनवर परिणाम करणारे इतर घटक देखील आहेत.

हिंद महासागर द्विध्रुव (OD) मध्ये मान्सूनला चालना देण्याची आणि एलनिनोचे दुष्परिणाम नाकारण्याची क्षमता आहे, हा आयओडी आता तटस्थ आहे आणि मान्सूनच्या सुरुवातीला मध्यम सकारात्मक होण्यास झुकत आहे.

एल निनो आणि आयओडी टप्प्याबाहेर असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मासिक पावसाच्या वितरणात कमालीची परिवर्तनशीलता येऊ शकते. हे सर्व हंगामाच्या उत्तरार्धात अधिक विस्कळीत होण्याची अपेक्षा आहे.

भौगोलिक परिस्थिती नुसार स्कायमेट संस्थेला देशाच्या उत्तर आणि मध्य भागांत पावसाची कमतरता असण्याची अपेक्षा आहे.

तर गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत अपुरा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

स्कायमेटच्या मते, जेजेएएससाठी मान्सूनची संभाव्यता 

अतिवृष्टी होण्याची शक्यता 0% आहे – LPA च्या 110% पेक्षा जास्त

सामान्यपेक्षा जास्त होण्याची शक्यता 15% LPA च्या 105 ते 110%
तर सामान्य प्रजण्यामान होण्याची 25% शक्यता आहे. LPA च्या 96 ते 104% दरम्यान असतो.

मात्र 40% शक्यता ही सामान्यपेक्षा कमी (मोसमी पाऊस जो LPA च्या 90 ते 95% ) पाऊस होण्याची शक्यता आहे.

दुष्काळाची शक्यता 20% आहे. (मोसमी पाऊस जो LPA च्या 90% पेक्षा कमी )

यामध्ये जून महिन्यात LPA च्या 99% (जूनसाठी LPA = 165.3 मिमी)

• सामान्य होण्याची 70% शक्यता
• सामान्यपेक्षा 10% शक्यता
• 20% शक्यता सामान्यपेक्षा कमी

जुलै महिन्यात – LPA च्या 95% (जुलैसाठी LPA = 280.5 मिमी)

• सामान्य होण्याची 50% शक्यता
• सामान्यपेक्षा 20% शक्यता
• 30% शक्यता सामान्यपेक्षा कमी

ऑगस्ट महिन्यात – LPA च्या 92% (ऑगस्टसाठी LPA = 254.9 मिमी)

• सामान्य होण्याची 20% शक्यता
• सामान्यपेक्षा 20% शक्यता
• सामान्यपेक्षा कमी ६०% शक्यता

तर शेवटी सप्टेंबर – LPA च्या 90% (सप्टेंबरसाठी LPA = 167.9 मिमी)

• सामान्य होण्याची 20% शक्यता
• सामान्यपेक्षा 10% शक्यता
• सामान्यपेक्षा कमी 70% शक्यता

अशी शक्यता या अंदाजात वर्तविण्यात आली आहे.

सदर कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकरी/ नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विशेषतः शेतक-यांनी विजांचा कडकडाट होत असताना शेतीचे कामे करू नये.

आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. झाडाखाली, विद्युत खांब / तारा याजवळ थांबू नये. धातूचे वस्तू सोबत बाळगू नये. खुल्या मैदानात असाल तर उंच ठिकाणी न थांबता खोलगट जागेत एखादी लाकडी वस्तू पायाखाली ठेवून खाली बसावे.

जलसाठ्याजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्यावर पोहण्यासाठी पाठवू नये, शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विध्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे, पुलावरून/नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल / नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये. अशा सुचना देण्यात आली आहे.

राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भात मात्र काही तुरळक ठिकाणी वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Wednesday, 12 April 2023

नोकरी: जालना येथे 192+ रिक्त जागांसाठी “या” तारखेला ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन..!

🎓नोकरी: जालना येथे 192+ रिक्त जागांसाठी “या” तारखेला ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन..!💥
💁🏻‍♂️ जालना येथे “मशीन ऑपरेटर, असेंबली लाइन ऑपरेटर, ईपीपी ट्रेनी, एचआर ट्रेनी” पदाकरीता स्पेशल जॉब फेअर-१ (२०२३-२४) जालना चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 14 एप्रिल 2023 आहे.

🛄 *रोजगार मेळाव्याचे नाव –* दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा जालना 
👨🏻‍💼 पदाचे नाव :-मशीन ऑपरेटर, असेंबली लाइन ऑपरेटर, ईपीपी ट्रेनी, एचआर ट्रेनी
👥 पदसंख्या :- 192+ जागा
🛅 भरती –* खाजगी नियोक्ता
🖨️ अर्ज पध्दती –* ऑनलाईन नोंदणी
🏢 विभाग –* छ. संभाजीनगर
📍 जिल्हा –* जालना 
📆 रोजगार मेळाव्याची तारीख –* 14 एप्रिल 2023
 💥मेळाव्याचा पत्ता :=डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,सांस्कृतिक सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय समोर, जालना

✍🏻 ऑनलाईन नोंदणी :-  shorturl.at/wDLPX

🎆कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा; गरजूंना नक्कीच फायदा होईल...

Monday, 10 April 2023

Pm Kisan Nidhi

👳‍♀️पीएम किसान योजनेचे नवे नियम याच                   शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पुढचा हफ्ता?
पीएम किसान योजनेचे नवे नियम याच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पुढचा हफ्ता 
पीएम किसान योजना: काही काळापासून सरकारचे कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष आहे. कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांनी हे सिद्ध केले आहे की ते केवळ त्यांच्या देशासाठी अन्नसुरक्षा देऊ शकत नाहीत, तर इतर देशांनाही अन्नपुरवठा करण्यास सक्षम आहेत. भारतीय शेतकऱ्यांसाठी अशा अतुलनीय योगदानाचे सरकार कौतुक करते आणि त्यांच्यासाठी फायदेशीर योजना आणते.

या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सबलीकरण प्रदान करणे हा आहे. अशीच एक कल्याणकारी योजना PM किसान सन्मान निधी योजना आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत प्रत्येकी दोन हजार रुपयांचे १३ हप्ते हस्तांतरित करण्यात आले आहेत. 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना सन्मान निधीचा लाभ मिळत आहे. काही वेळाने 14वा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.

अनेक शेतकऱ्यांना सन्मान निधीचे हप्ते मिळण्यातही अडचणी येतात. अशा परिस्थितीत लाभार्थीला त्याची पात्रता आणि योजनेचे नियम माहित असले पाहिजेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळविण्यासाठी ई-केवायसी, आधार सीडिंग आणि जमीन सीडिंग अत्यंत आवश्यक आहे. ही तिन्ही कामे पूर्ण झाली तरच सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. या तिन्ही गोष्टी पूर्ण करणे सोपे आहे.

ई-केवायसीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्राशी संपर्क साधू शकता. त्याच वेळी, आधार सीडिंगसाठी, तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. दुसरीकडे, जमिनीच्या पेरणीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याचा सल्ला घेऊ शकता.

जर तुम्ही देखील पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल. सन्मान निधी खात्यात पैसे येत नसल्यास, विलंब न करता ई-केवायसी करा. 

ई-केवायसी कशी करायची :-

यासाठी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्या. 
इथून उजवीकडे फार्मर्स कॉर्नरच्या विभागात जा. 
E-kyc च्या पर्यायावर क्लिक करा. 
तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक येथे एंटर करा. 
अशा प्रकारे, तुम्ही तुमचे ई-केवायसी काही मिनिटांत पूर्ण करू शकता.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी काही कारणांमुळे आपली पात्रता गमावली आहे. तुमचे नाव देखील यादीतून वगळले जाऊ नये, म्हणून PM किसानच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव वेळेत तपासत रहा.

कसा तपासायचा लाभार्थी दर्जा :-

यासाठी पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलला pmkisan.gov.in वर भेट द्यावी लागेल. 
उजव्या बाजूला शेतकरी कॉर्नरच्या विभागात लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करा. 
येथे शेतकऱ्याने आपला नोंदणी क्रमांक आणि 10 अंकी मोबाईल क्रमांक टाकावा. 
शेवटी कॅप्चा कोड भरून सबमिट करा. 
अशा प्रकारे शेतकरी त्यांचा लाभार्थी दर्जा तपासू शकतात.

Friday, 7 April 2023

👳‍♀️वीज बिलाचे दर 👳‍♀️

वीज सेवेबाबत ग्राहकांनी आधीक जागृती दाखवण्याची गरज आहे!वीज वितरण सेवेतील ढिसाळपणामुळे ग्राहकांची कोट्यावधी रुपयाची हानी होते.इन्व्हर्टर,जनरेटरवर खर्च करावा लागतो.

मुळात लाईट गेल्यावर नुकसाभरपाई मिळू शकते हे ग्राहकांना, नागरिकांना माहिती आहे का?

आपल्या सर्वांसाठी MSEB संबधी एक उपयुक्त माहिती वाढती वीज बिलांची आता ग्राहकांनीचं घ्यावी काळजी.



आपल्या बिलात लावले जाणारे वेगवेगळे आकार समजून घ्या.


महावितरण कंपनीच्या चुकीमुळे वीज ग्राहकांना अकारण आलेल्या सदोष देवकामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये, या उद्देशाने वीज ग्राहकांना न्याय देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ग्राहक तक्रार निवारण मंचापुढेच ग्राहकांना न्याय द्यायचा कसा, असे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या मंचाचे कामकाज करण्यासाठी महावितरण कंपनीने पूर्णवेळ कुशल कर्मचारी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

🟡 अशी आहे स्थिती...

💥वीज गाहाणे निवारण मंच हा जिल्हा न्यायालयाच्या समकक्ष मानला जातो.

💥 या मंचाच्या अध्यक्षपदी जिल्हास्तरीय न्यायिक पदावर काम केलेल्या सेवानिवृत्त अधिकान्यांची नियुक्ती केली जाते.

💥 या तरतुदीनुसार पुणे परिमंडलातील या मंचाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. जटाळे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

💥 परंतु महावितरणकडून न्यायदानासाठी आवश्यक पूर्णवेळ कुशल कर्मचारी वर्ग मिळत नसल्याने, उद्विग्न होऊन जटाळे यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये या पदाचा राजीनामा दिलेला आहे.

💥तेव्हापासून या मंचाचे एक सदस्य अजय भोसरेकर हे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.

🎆 नियम काय सांगतो?

💥ग्राहक मान्हाणे निवारण मंच आणि विद्युत नियमावली २००६ नुसार हा गाहाणे निवारण मंच सुरू करण्यात आलेला आहे.

💥त्यानंतर १७ मे २०२० रोजी ग्राहक गान्हाणे निवारण मंच व विद्युत लोकपाल विनियम २०२० मंजूर करण्यात आले आहे.

💥 हा मंच तीनसदस्यीय करण्यात आला आहे.

💥 यामध्ये जिल्हास्तरीय सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी (उदा. जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी) हे अध्यक्ष असतील, असे बंधन आहे.

💥त्यानंतर एक महावितरणचा प्रतिनिधी आणि एक ग्राहक प्रतिनिधी असे दोन सदस्य असतील, अशी तरतूद आहे.

💥 मंचासाठी आवश्यक पूर्णवेळ कर्मचारी पुरविण्याची जबाबदारी महावितरण कंपनीकडे देण्यात आलेली आहे.

🎆 थेट अध्यक्षांकडे तक्रार करता येते? 

वाढीव वीजबिल कमी करण्यासाठी या मंचाच्या कार्यालयात तक्रार दाखल करता येते. पुणे शहरातील या मंचाचे कार्यालय हे मंगळवार पेठेतील जुना बाजार रस्त्यावरील महावितरण कंपनीच्या कार्यालयात तिसया मजल्यावर आहे. याशिवाय या मंचाच्या अध्यक्षांकडे मोबालईद्वारे थेट तक्रार करता येते. मंचाचे प्रभारी अध्यक्ष अजय भोसरेकर यांच्या ८८०६९११९९९ या मोबाईल क्रमांकावर तक्रार दाखल करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

🎆मंचाची कार्यपद्धती.....

👳‍♀️महावितरणकडून अकारणपणे वाढीव वीजबिल आल्यास, त्याच्या विरोधात ग्राहकांना दाद मागता यावी, यासाठी हा ग्राहक गान्हाणे निवारण मंच आहे.

💥अकारण वाढीव वीजबिल आलेले ग्राहक या मंचाकडे थेट कार्यालयात येऊन किंवा फोनद्वारे तक्रार करू शकतात.

💥प्राप्त तक्रारींवर मंचापुढे रीतसर सुनावणी घेतली जाते.

💥या सुनावणीत ग्राहकाला आणि वीज मंडळाला आपापली बाजू मांडण्याची संधी दिली जाते.

💥 या सुनावणीत बिल अकारण वाढल्याचे निदर्शनास येताच, तत्काळ ते कमी करण्याचा आदेश मंच देत असतो. पर्यायाने ग्राहकांना न्याय मिळतो.


💥कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा; गरजूंना नक्कीच फायदा होईल.